Dombivali police arrested man for committing engagement with one woman marrying another; एकीशी लग्न, दुसरीशी साखरपुडा, डोंबिवलीकर तरुणाची पोलिस स्टेशनात ‘वरात’
डोंबिवली : एकीशी साखरपुडा करुन दुसरीसोबत साता जन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडली असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत.सिद्धार्थ शिंदे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी तो पीडित मुलीला एका लग्ना दरम्यान भेटला. पीडित मुलीच्या आई वडिलांशी लग्नाची बोलणी करत असल्याचे भासवत त्याने साखरपुडा केला. लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी तो विवाहबद्ध झाला. एकाच झाडावर कापली आयुष्याची दोर, पालघरमधील प्रेमी युगुलाचा वेदनादायी शेवट डोंबिवलीत राहणाऱ्या सिद्धार्थ शिंदे या तरुणाला चार वर्षांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरुणी दिसली. त्याचे तिथेच तिच्यावर प्रेम जडले. लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आई-वडिलांना सांगून पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा केला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत होता. मात्र तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी त्याने लग्न केले.
पप्पूचा भांडाफोड; बोकडाचं सांगून द्यायचा बकरीचं मटण, ग्राहकाला शंका आली अन् सगळचं समोर
याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठले. सिद्धार्थ व त्याच्य आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला आहे.