सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अंश °दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ५० °अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकतो, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६.७८ °अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो. शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो, तो दक्षिण भारतात तेलंगणपर्यंत २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी त्यास प्रारंभ झाला असून धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
या दिवशी सोडणार साथ
विदर्भात १७ मे रोजी अहेरी, आल्लापल्ली येथे शून्य सावली दिवस अनुभवला. १८ मे रोजी मूलचेरा, १९ मे रोजी गोंडपिंपरी, बल्लारपूर, २० मे रोजी चंद्रपूर, वाशीम, मुकुटबन, पांढरकवडा, झरी, वणी, दिग्रस, लोणार, २१ ला गडचिरोली, सिंदेवाही, वरोरा, घाटंजी, मेहकर, २२ मे रोजी यवतमाळ, बुलढाणा, आरमोरी, चिमूर, २३ ला अकोला, हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड, कुरखेडा, देसाईगंज, रामटेक, २४ मे रोजी वर्धा, शेगाव, पुलगाव, २५ ला अमरावती, दर्यापूर, २६ मे रोजी नागपूर, आकोट, भंडारा, २७ ला तुमसर, परतवाडा, रामटेक,२८ मे ला गोंदिया येथे शून्य सावली दिवस आहे.