जर बँकेत तुम्ही मुदत ठेव असेल तर लवकरच एक फॉर्म सबमिट करा, जेणेकरून ठेवींवरील व्याजावर कर कापला जाणार नाही. जर तुम्ही मुदत ठेवीदार असाल तर बँकेत फॉर्म १५जी आणि फॉर्म १५एच सबमिट करणे आवश्यक आहे, नाहीतर तुमचा TDS कापला जाऊ शकतो.
ठेवीदारांची कर बचत कशी होईल?
मुदत ठेव (FD) ग्राहकांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फॉर्म १५जी किंवा १५एच दरवर्षी सबमिट करणे आवश्यक असतो. हा फॉर्म व्याजावर TDS (स्रोतावर कर वजा) टाळण्यासाठी भरला जातो. ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले ग्राहक फॉर्म १५जी अंतर्गत कर सूटचा दावा करू शकतात, तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना फॉर्म १५ एच वापरून टीडीएस सूट मिळू शकते.
फॉर्म १५जी म्हणजे काय?
जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असून तुम्ही मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे, तर तुम्ही फॉर्म १५जी भरण्याचा सल्ला दिला जातो. हा फॉर्म भरून व्याजावरील कर म्हणजेच टीडीएस कापला जाणार नाही. फॉर्म १५जी आयकर कायदा, १९६१ च्या कलम १९७ए अंतर्गत उपलब्ध असून याद्वारे बँकेला तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती मिळते. या फॉर्मद्वारे तुम्ही बँकेला तुमच्या व्याज उत्पन्नातून टीडीएस कापणे थांबवण्यास सांगू शकता.
फॉर्म १५एच काय आहे?
६० वर्षांपेक्षा जास्त म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेवीच्या व्याजावरील टीडीएसची कपात टाळण्यासाठी फॉर्म १५एच भरणे गरजेचे आहे. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ठेवींवरील व्याजाचे पैसे कोणत्याही कर कपातीशिवाय मिळते. फॉर्म १५जी/एच सबमिट करण्याचा कोणताही नियम नाही. जर एका आर्थिक वर्षात तुम्हाला रु. ४०,००० पेक्षा जास्त व्याज मिळाले असेल तर हा फॉर्म उपयुक्त ठरेल. तसेच तुम्ही दरवर्षी फॉर्म १५जी सबमिट केल्यास तुम्हाला टीडीएस भरावा लागणार नाही.