परभणी: महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत आहेत. पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळा विचार करत शेतकरी नव्या वाटा शोधत आहेत. परभणी शहरापासून १३ किलोमिटर अंतरावर असलेले सिंगणापूर हे गाव भाजीपाल्यासाठी प्रसिध्द आहे. येथील शेतकरी माणिक खिल्लारे यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. माणिक खिल्लारे यांनी अंजीर फळपिकाची लागवड केली आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. खिल्लारे यांचा अंजीर शेतीचा प्रयोग शेतकयांसाठी आर्थिक समृध्दीचा नवा मार्ग दाखवणारा ठरला आहे.

माणिक खिल्लारे यांनी वडिलोपार्जित मिळालेल्या ११ एकर शेतात रात्रंदिवस काम केले. सन २०१७ मध्ये त्यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेतला. यावर्षी ३०० रोपांची लागवड केली. तसेच २०१९ मध्ये आणखी २०० रोपांची लागवड केली आणि कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेत अंजीर शेती सांभाळली. अंजीर पीकामध्ये सुरुवातीचे दोन वर्ष सोयाबीन अंतर पीक घेवून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

माणिक खिल्लारे यांना अंजीराच्या रोपांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने आता यातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२० आणि २०२१ मध्ये माणिक खिल्लारे यांनी अंजीर विक्रीतून खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे.
माजी मुख्यमंत्र्यांकडेच पुन्हा कर्नाटकची कमान, सिद्धरामय्या CM च्या खुर्चीवर, शपथविधीचा मुहूर्त ठरला
विशेष म्हणजे चांगला दर मिळावा म्हणून माणिक खिल्लारे थेट व्यापाऱ्यांना विक्री न करता ते स्वतः ग्राहकांकडून जावून अंजीरांची विक्री करतात. खिल्लारे यांनी एकदा अंजीरची बाग व्यापायाला विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दर कमी मिळत असल्याने स्वतःच अंजीर विक्रीचा निर्णय घेतला. या कामामध्ये बी.एसस्सी अॅग्री झालेला त्यांचा मुलगा अशोक देखील मदत करतो.
Heat Wave: काळजी घ्या! पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; सूर्य आग ओकणार, तापमान वाढणार…
राज्य शासनाच्या शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल विक्री केला जातो. जिल्ह्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील खिल्लारे यांच्याकडून अंजीरची खरेदी करतात. नाविण्यपूर्ण प्रयोगातून पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीच्या माध्यमातून खिल्लारे यांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी देखील माणिक खिल्लारे यांच्या अंजीर शेतीच्या प्रकल्पाला भेट दिली आहे.

समीर वानखेडेंनी मोठ्या टेचात ते वाक्य उच्चारलं, अवघ्या काही दिवसांत ग्रह फिरले; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here