मुंबई : शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने आपली चार महिन्यांची पेन्शन खात्यावर जमा झाली नसल्याने चौकशीसाठी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर कॉल केला असता, सायबर चोरट्याने या नागरिकाला आपल्या जाळ्यात अडकवल्याची घटना घडली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने कांदिवली पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ज्येष्ठ नागरिकाची जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंतची पेन्शन खात्यावर जमा झाली नव्हती. पेन्शन का जमा झाली नाही, याची चौकशी करण्यासाठी गुगलवरून ईपीफओच्या वेबसाईटवरून तक्रार करण्यासाठी दिल्या गेलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क केला होता. मात्र समोरून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने एका अनोखळी नंबरवरून फिर्यादींना कॉल आला आणि आपण ईपीफओतून पंकज श्रीवास्तव बोलत असल्याचं सांगण्यात आलं. तसंच समोरील व्यक्तीने मी सांगेल तसे केले तर लगेच एका तासात तुमची पेन्शनची रक्कम खात्यावर जमा होईल, असे फिर्यादींना सांगितले.

समीर वानखेडेंनी मोठ्या टेचात ते वाक्य उच्चारलं, अवघ्या काही दिवसांत ग्रह फिरले; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

फिर्यादींनी सहमती दर्शवताच त्यांना एक अॅप डाउनलोड करायला सांगितले गेले. यानंतर फिर्यादींना युजर आयडी आणि पासवर्डची माहिती त्या अॅपमध्ये भरायला लावली आणि ईपीफओची वेबसाईट ओपन झाली. फिर्यादींनी तिथं आपल्या ईपीफओच्या खात्याची माहिती भरल्यावर श्रीवास्तव याने ट्रॅन्जॅक्शन फी म्हणून १० रुपये भरावे लागतील असं सांगितले. ही फी भरण्याकरता फिर्यादींनी आपल्या बँक खात्याबद्दल माहिती भरताच त्यांना खात्यावरून ७० हजार ९७८ रुपये काढल्याचा मेसेज आला.

दरम्यान, खात्यावर रक्कम काढल्यानंतर समोरील फोन बंद केल्यानंतर फिर्यादींनी पुन्हा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here