सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील शिवसेनेच्या एका मंत्र्याला लक्ष्य केल्यामुळं राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं हे आरोप फेटाळले आहेत. तर, गृहखातं हातात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आतापर्यंत यावर थेट भूमिका मांडली नव्हती. नगरमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज यावर भाष्य केलं. सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत आहे का, असं थोरात यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘या गोष्टीचं कोणीही राजकारण करू नये,’ एवढंच ते म्हणाले.
वाचा:
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ‘पद्म’ पुरस्कार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, ‘मंत्रिमंडळाचे कोणतेही सदस्य हे या समितीचे सदस्य असतात. त्यामुळे कोणीही अध्यक्ष होऊ शकतो.’
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री यांनीही लवकरच राज्यातील सरकारचे विसर्जन होईल, असे वक्तव्य केले आहे. याबाबत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘रामदास आठवले यांनी नेमके काय वक्तव्य केले आहे, ते मी ऐकले नाही. परंतु भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times