छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंधांमध्ये पत्नी अडसर ठरत असल्यामुळे पतीने पत्नी धमकी दिली. आत्महत्या कर नाहीतर मी तुला मारून टाकेल, अशी धमकी पतीने दिल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही अशी सुसाईड नोट भिंतीवर लिहून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ मे मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभांगी विनोद काळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर पती विनोद काळे, सासरा विजय काळे, दीर विश्वनाथ काळे, सासू आणि जाऊ (राहणार सर्व जय भवानीनगर) यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शुभांगी आणि विनोद यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर पती विनोद शुभांगीला त्रास देत होता. पतीचे बाहेर एका महिलेशी संबंध होते. या अनैतिक संबंधांमध्ये पत्नी अडसर ठरत असल्यामुळे विनोद हा पत्नीलाला धमकावत होता. आत्महत्या कर नाही तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यासोबत रोज त्रासही देत होता. या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने माहेरच्या मंडळींनाही सांगितलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

लॉजमध्ये डमी ग्राहक पाठवला, दाम्पत्याने चौघींना उभं केलं, इशारा मिळताच पोलीस धडकले अन्…
दरम्यान, १३ मे रोजी शुभांगीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. पण आत्महत्येपूर्वी तिने एक मजकूर लिहून ठेवला. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, अशा आशयाचा मजकूर तिने भिंतीवर लिहिला होता, असे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे. मात्र, हा मजकूर शुभांगीने लिहिला आहे का? याचा तपास करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा मुकुंदवाडी पोलीस तपास करीत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून पुण्यासाठी आजपासून ई बस सुविधा; जाणून घ्या वेळापत्रक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here