मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो आहे. रबाडाची गणना ही जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. आयपीएलमध्येही त्याने हे सिद्ध करुन दाखवले आहे. पण, यंदाची आयपीएल त्याच्यासाठी आतापर्यंत काही खास ठरलेली नाही. त्याच्या गोलंदाजीत आता ती धार दिसत नाही ज्याच्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी कागिसो रबाडाच्या नावाने फलंदाज थरथर कापायचे. आयपीएलमध्ये जेव्हा तो मैदानावर उतरायचा तेव्हा विरोधा संघाला घाम फुटायचा. मात्र, आता त्याचा फॉर्म खराब झाला आहे. तो मैदानात संघर्ष करताना दिसतो.कागिसो रबाडाला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने (Punjab Kings) ९.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पहिल्या सत्रात रबाडाने पंजाबसाठी आयपीएलमध्ये २३ बळी घेत सर्वांनाच प्रभावित केलं होतं. पण, आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये रबाडाचा जादू दिसत नाहीये. या मोसमात तो आतापर्यंत फक्त ५ सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने १०.११ च्या खराब इकोनॉमीने गोलंदाजी करताना केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाज त्याला मोठ्या सहजतेने धावा ठोकत आहेत. त्यामुळे रबाडाला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले आहे.

IPL 2023: बदला! विराटला भिडणाऱ्या नवीन-उल-हकला रोहितने षटकार ठोकत जागा दाखवली
कागिसो रबाडा जेव्हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा तेव्हा फलंदाजांना टेन्शन यायचं. २०२० हा त्याचा सर्वोत्तम आयपीएल सीझन होता, ज्यामध्ये कागिसोने १७ सामन्यांमध्ये ३० विकेट्स घेतल्या होत्या. २०२० च्या आयपीएलमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक विकेट्स होत्या, ज्यामुळे त्याला पर्पल कॅप देखील देण्यात आली होती. रबाडाने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ६८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ८.४० च्या इकॉनॉमीने १०४ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सुपर ओव्हर झाली होती. त्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने केकेआरसमोर केवळ ११ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दिल्लीकडून कागिसो रबाडा सुपर ओव्हर टाकायला आला. तिथे त्याच्यासमोर स्फोटक आंद्रे रसेल होता. रसेलसारख्या वेगवान फलंदाजासमोर ११ धावांचे लक्ष्य म्हणजे काहीच नाही. मात्र, रबाडाने अप्रतिम यॉर्कर टाकून रसेलला क्लीन बोल्ड केले. रबाडाच्या षटकात केकेआरला केवळ ७ धावा करता आल्या आणि दिल्लीने तो सामना ३ धावांनी जिंकला होता.

१६ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात घेतलं, तोच स्टोक्स CSK ला पडला महागात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here