कुठेतरी आपण विसरतो की महिन्याखेरीस आपल्याला खर्च भरून काढावा लागतो. क्रेडिट कार्ड कंपन्या तुमचे मन आणि खिशातील अंतर चांगलंच समजतात. हेच कारण आहे की क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला एक सुविधा देतात, ज्याला मिनिमम ड्यू किंवा किमान देय रक्कम म्हणतात.
किमान देय रक्कम तुम्हाला मोहात पाडते
तुम्ही जर तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल काळजीपूर्वक पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की एकीकडे तुम्हाला तुमच्या बिलाची संपूर्ण रक्कम दिसेल. यासोबतच पुढील फील्डमध्ये Minimum Amount Due चा पर्यायही दिसेल. किमान रक्कम म्हणजे जर तुम्ही संपूर्ण बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही किमान देय रक्कम देखील भरू शकता.
किमान देय रक्कम भरून शांत बसू नका!
जर एखाद्या महिन्यात तुम्ही किमान रक्कम भरत असाल तर सुटकेचा निश्वास सोडू नका. तुम्ही क्रेडिट कार्डाच्या बिल भरण्याच्या कटकटीतून मुक्त झाले आहात, असे समजू नका. हे एकप्रकारच्या कर्जाचे जाळे आहे. कंपनी किमान देय रकमेच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे घेते, जे व्याज आणि फाइल चार्जेसमध्ये वापरले जाते. आणि तुमची मूळ रक्कम तेवढीच राहते.
मिनिमम ड्यू (किमान देय राक्क्क्म) म्हणजे काय?
किमान देय रक्कम ही तुमच्या एकूण बिलाचा एक भाग असते, जे तुम्हाला क्रेडिट कार्ड विलंब शुल्कासारख्या अतिरिक्त दंडांपासून दिलासा देते. परंतु तुम्हाला संपूर्ण बिलावर दरमहा ३ ते ४% दराने शुल्क भरावे लागते. यानुसार, तुम्हाला वार्षिक सुमारे ४० ते ५०% व्याज भरावे लागेल आणि तेही तुम्ही खरेदी कराल त्या दिवसापासून.
किमान देय रकमेचे गणित
सामान्यतः किमान देय रक्कम तुमच्या एकूण थकबाकीच्या ५% असते. परंतु ही रक्कम प्रत्येक बँकेच्या क्रेडिट कार्डानुसार वेगवेगळी असून शकते. तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलातील एकूण थकबाकी जास्त असेल तर ती त्या रकमेच्या ५% हुन कमी असू शकते. एकूण बिलाची रक्कम कमी असेल तर तीही सुमारे पाच टक्के असू शकते.
किमान देय रक्कमेचे नुकसान?
होय. तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलावर देय असलेली किमान रक्कम भरल्यास तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. कारण, ही रक्कम व्याज भरण्यासाठी वापरली जाते, तर मूळ रक्कम भरण्यासाठी नाही. तुम्ही तुमची देय रक्कम पूर्ण होईपर्यंत व्याज आकारले जाईल. तर तुम्हाला ५०% व्याज द्यावे लागेल, ज्याला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवता येईल.
तुमचा सिबिल स्कोरही खराब होईल?
बर्याचदा बँका तुम्हाला सांगतात की किमान देय रक्कम भरल्याने तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होत नाही. परंतु तज्ज्ञांनुसार जेव्हा तुमच्या कर्जाची रक्कम कमी होण्याऐवजी तशीच राहते किंवा वाढते, तेव्हा CIBIL स्कोअर खालावणे निश्चित आहे. एवढेच नाही तर बँक तुम्हाला एक ग्राहक म्हणून ओळखेल ज्यांच्याकडे तरलतेची कमतरता आहे. असे ग्राहक येत्या काळात कर्जाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.