तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आता नियमावली जारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्र घालण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. हे नवे नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. असभ्य आणि अशोभनीय कपडे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा मजकूर लिहिलेले फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचा सल्लाही मंदिर प्रशासनाने दिला आहे.कोणत्या कपड्यांवर बंदी?
तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाने ड्रेसकोडबाब जारी केलेल्या नवे नियम पाळावे लागणार आहेत. या नव्या नियमावलीचे फलक मंदिरात लावण्यात आलेले आहेत. नव्या नियमानुसा बरमोडा, हाफ पँट, उत्तेजक कपडे आणि अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही.

महिलांसह पुरुषांसाठीही आहेत नियम
नव्या नियमांनुसार आता मंदिर किंवा मंदिर परिसरात वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट परिधान करून येता येणार नाही. हा नियम जसा मुली, महिलांना लागू आहे, तसाच तो पुरुषांना देखील लागू आहे.