कानपूर: एका व्यक्तीने आपल्या पुतण्याला आणि त्याच्या बायकोला जिवंत जाळून त्यांचा खून केला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे आत्याच्या नवऱ्याने (७२ वर्ष) आपली ई-रिक्शा परत घेण्यासाठी पुतण्याला आणि त्याच्या पत्नीला जिवंत पेटवलं आहे. यासाठी ही व्यक्ती गेल्या वर्षभरापासून तयारी करत होता. त्यांना जाळण्यासाठी तो गेल्या वर्षभरापासून पेट्रोल जमा करत असल्याचं त्याने सांगितलं. तर, जेव्हा याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याला याबाबत कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नव्हता.कानपूरमध्ये मंगळवारी ७२ वर्षीय रामनारायण यांनी त्यांचा पुतण्या रामकुमार आणि त्यांची पत्नी सपना यांना कॅन्ट परिसरात पेट्रोल ओतून जिवंत जाळले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेली रामकुमारची बहीण मोनिकाही या घटनेत होरपळली. पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले, जिथे रामकुमार आणि त्यांची पत्नी सपना यांचा मृत्यू झाला. तर, बहीण मोनिकाची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.
राम कुमारच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आत्याचा नवरा रामनारायण याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी रामनारायण हा घटनास्थळावरून पळून गेला होता, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. या दोघांना पेटवण्यासाठी मी गेल्या वर्षभरापासून थोडे-थोडे पेट्रोल गोळा करत होतो, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनारायणने पुतण्याला ई-रिक्षा विकत घेऊन दिली होती. तो गेल्या वर्षभरापासून ही ई-रिक्षा परत मागत होते. पण, रामनारायण त्यांच्याच घरात राहत असल्याने पुतण्या ई-रिक्षा परत करत नव्हता. ई-रिक्षा परत न मिळाल्याच्या रागातून रामनारायणने भयंकर कट रचला. त्यासाठी त्याने वर्षभरापासून पेट्रोल गोळा करायला सुरुवात केली होती.
या घटनेत मृत्यू झालेल्या रामकुमारला दोन लहान मुली आहेत. तो ई-रिक्षा चालवून घरखर्च चालवत होता. आता त्याच्या दोन्ही मुली अनाथ झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामनारायण याला अटक करुन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.