दिल्ली: मेट्रोच्या सुपरवायझरनं पत्नी, मुलीला संपवून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. पत्नी, मुलगी आणि मुलाचा गळा चिरुन कुटुंब प्रमुखानं गळफास घेतला. पोलिसांनी सुपरवायझरच्या घरात पेन्सिलनं लिहिलेली नोट सापडली आहे. ही चिठ्ठी मेट्रो सुपरवायझर सुशील कुमारची पत्नी अनुराधाची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पत्नीचे दागिने चोरुन गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेले पैसे घोड्यांच्या शर्यतीवर लावले. त्या जुगारात भलीमोठी रक्कम गमावली, असा उल्लेख चिठ्ठीत आहे.सुशीलच्या घरात पेन्सिलनं लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ‘सुशीलचे वडील २०१६ मध्ये सरकारी कंपनी भेलमधून निवृत्त झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर सुशीलला १६ लाख रुपये मिळाले होते. त्यानं ही रक्कम सट्ट्यात गमावली. यानंतर सुशीलनं पत्नीचे दागिने चोरुन गहाण ठेवले. अनेक जण कर्जानं दिलेले पैसे मागायला दारावर यायचे. त्यामुळे कुटुंबियांची अवस्था बिकट झाली होती,’ असा उल्लेख चिठ्ठीत आहे. ज्योती नगरात वास्तव्यास असलेल्या सुशीलनं पत्नी अनुराधा, ६ वर्षांची मुलगी आणि १३ वर्षांच्या मुलावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्यानं गळफास घेतला. सुशील, अनुराधा आणि मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो आयसीयूमध्ये आहे. पोलिसांनी सुशीलचा फोन ताब्यात घेतला आहे. त्यातून आणखी महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुटुंबियांवर हल्ला करण्यापूर्वी सुशीलनं इंटरनेटवर गळफास कसा लावतात, त्यासाठी गाठ कशी बांधतात, याबद्दल सर्च केलं होतं. सुशीलच्या घरी घडलेल्या घडामोडींची माहिती त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं पोलिसांना दिली. दिल्ली मेट्रोमध्ये काम करणारा सुशील मंगळवारी कामाला गेला नाही. त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यानं दुपारी बाराच्या सुमारास कॉल केला. तेव्हा सुशील रडत होता. मी सगळ्यांना मारुन टाकलं आहे, असं सुशीलनं फोनवर सांगितलं. त्यानंतर सुशीलच्या सहकाऱ्यांना पोलिसांना फोन करुन याबद्दलची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा घरात तिघांचे मृतदेह सापडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here