जगदंबा तलवार आणि वाघनखं मिळवण्यासंबंधी ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांशी चर्चा केली होती. यासंबंधी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिचनच्या उप उच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल आणि द्वीपक्षीय संबंधांचे उपप्रमुख इमोजेन स्टोन यांच्याशी चर्चा केली होती. गेल्या महिन्यात १६ एप्रिलला त्यांची बैठक झाली होती.
‘आपण पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहोत. आणि या दौऱ्यात सामंजस्य कराराला अंतिम स्वरुप देण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या एका कार्यक्रामासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. पण अजून हे नियोजून पूर्ण झालेले नाही’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे होत आहेत. यापार्श्वभूमीवर २ जूनपासून राज्यात १०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज महाराज आणि इतर मान्यवरांना या आयोजित कार्यक्रमांमध्ये निमंत्रित करण्यात येणार आहे.