शिरूर (पुणे) : अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या रांजणगावच्या महागणपती मंदिरातही आता ड्रेसकोड करण्यात येणार असल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजा भवानी माता मंदिर प्रशासनाने नव्या ड्रेसकोडबाबत बोर्ड लावल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील मंदिर प्रशासनाने देखील ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

याबाबत गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टने याबाबची नोटीस लावली असून या जाहीर नोटिसीवर वेस्टर्न कपड्यांना बंदी आणल्याचं सुचित करण्यात आलंय. सर्व भाविकांना कळवण्यात येत आहे की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची सर्व भाविकांनी मोंद घ्यावी.’ असा आशय बोर्डवर लिहिण्यात आला आहे.

तसेच या नोटिसीमधून देवस्थान ट्रस्टकडून भाविकांना वेस्टर्न कपडे घालून येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही वेळात मंदिर परिसरात फलक लावण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Tulja Bhavani: तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जारी; ड्रेसकोड लागू
रांजणगाव गणपती दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. लाखोंच्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. अनेक भाविक या ठिकाणी तर मुक्कामी देखील असतात. मात्र प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याबाबतचे बोर्ड सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या निर्णयाला विरोध होतो का आणि विरोधानंतर मंदिर प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

तुळजापूरमध्येही नवा ड्रेसकोड

तुळजापूरच्या मंदिरात आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताऱ्या भाविकांना देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्र घालण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आलेत. आजपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. असभ्य आणि अशोभनीय कपडे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असा मजकूर लिहिलेले फलक मंदिरात लावण्यात आलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here