एप्रिल महिन्यातील काही दिवसांमध्ये शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करण्यासाठी सरासरी सर्वाधिक तापमान आणि उच्चतम उष्णता निर्देशांकाची तपासणी केली. यासाठी शास्त्रज्ञांनी दक्षिण आणि पूर्व भारतासह बांगलादेश, थायलंड आणि लाओसमधील काही ठिकाणांची निवड केली. तापमान आणि हवेतील आर्द्रता यांचा मानवी शरीरावर काय परिमाम होतो हे नेमकेपणाने मोजण्याचे परीमाण म्हणजे हा उष्णता निर्देशांक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे.
या पाहणीत शास्त्रज्ञांना असे आढळले की तापमानवाढीत २ सेल्सियसने वाढ होऊन दमट उष्णतेच्या लाटेत ३० पटीने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शास्त्रज्ञांनी इशारा देताना सांगितले की, एकूण हरितगृह वायू उत्सर्जन थांबेपर्यंत, जागतिक तापमान वाढतच जाईल आणि अशा घटना अधिक वारंवार आणि गंभीर होतील.
शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा
बांगलादेश आणि भारतात, उष्णतेच्या लाटेच्या घटना सरासरी शतकात एकापेक्षा कमी वेळा घडत असत. आता मात्र ते पाच वर्षांतून एकदा अपेक्षित आहे. तापमानात वाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास, ही स्थिती सुमारे ३० वर्षांत येईल. जर उत्सर्जन वेगाने कमी केले गेले नाही, तर या घटना दर दोन वर्षांतून एकदा घडण्याचीही शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांनी आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेच्या हंगामात उद्भवलेल्या इतर धोक्यांमुळे देखील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणखी वाढला आहे. भारतात या वर्षी १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान जंगलांमध्ये एकूण १,१५६ वेळा आग लागल्याची घटना घडली आहे.