तुळजापूर :तुळजाभवानी मंदिर परिसरात भक्तांसाठी लावण्यात आलेल्या ड्रेसकोडबाबतच्या सूचनांबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘तुळजाभवानी संस्थानच्या परिसरात, महाद्वारावर भाविकांनी अंग प्रदर्शक, उत्तेजक,असभ्य,अशोभनिय वस्त्रधारी तसेच हाफ पँन्ट, बर्मुडाधारीना मंदिरात प्रवेश नाही, कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा’, असे फलक तुळजा भवानी संस्थानच्या नावे लावण्यात आले होते. तुळजापुर शहरातील काही पुजारी बांधवानी तहसिलदार तथा व्यवस्थापक सौदागर तांदळे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा आज सत्कार केला आहे. परंतु असे बँनर लावण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिलेच नाहीत किंवा तसा ठराव देखील झालेला नाही, असे तुळजाभवानी संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे. मग हे बँनर लावले कोणी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मी ड्रेसकोड बाबतचे तसे आदेश दिलेले नाहीत. त्याच प्रमाणे तसा ठराव देखील झालेला नाही. उदया या सर्व प्रकरणाचा तहसिलदार शोध घेतील आणि आम्हाला कळवतील. त्या नंतर आम्ही संबधितावर कारवाई करु, असे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना स्पष्ट केले आहे.

उपस्थितांना फक्त १ पेढा, लग्नपत्रिकेला हसाल; खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितली त्यांच्या लग्नाची गोष्ट
मी काल, परवाच चार्ज घेतलाय. तत्कालीन तहसिलदार तथा व्यवस्थापकांनी हे फलक तयार केले होते अस वाटतंय. हे फलक काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबधिताला नोटीसही देण्यात आलेली आहे. माझा सत्कार कशासाठी केलाय हे मला माहीतच नाही. मी तेथे गेलो तेव्हा मला फलक लावलेले दिसले. मला या संदर्भातील कागदपत्रं दिसत नाहीत. मला संबंधित फाइल तपासून पाहाव्या लागतील. त्यानंतरच यातील नेमके सत्य स्पष्ट होणार आहे, असे तहसिलदार आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी म्हटले आहे.

Heatwave in India: एप्रिलमधील उष्णतेच्या तीव्र लाटेचे कारण काय?, शास्त्रज्ञांनी केले स्पष्ट, दिला गंभीर इशारा
या प्रतिक्रियेनंतर रात्री तहसिलदार तांदळे यांनी अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

Tulja Bhavani Mandir

तुळजाभवानी मंदिर

फलकावर काय होत्या नेमक्या सूचना?

तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत याबाबत मार्गदर्शन करणारे सूचनापलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी, तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा मजकूर या फलकावर लिहिण्यात आला होता.

Breaking: मध्यान्ह भोजन योजनेत ६७ कोटी ५३ लाखांचा महाघोटाळा उघड, २७ हजार कामगार बोगस निघाले

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here