डोंबिवली : सुशिक्षित व सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरातून गेल्या दीड वर्षात ९३ मुली गायब असल्याची धक्कादाबाब समोर आली आहे. डोंबिवली पोलिसांनी यात ८४ अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असून ९ मुलीं अजूनही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आई-वडिलांनी मुली बरोबर मैत्रीण बनून तिची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेडोंबिवलीत मानपाडा , विष्णुनगर , टिळकनगर व डोंबिवली रामनगर असे चार पोलीस ठाणे असून या चार पोलीस ठाण्यात दिल्या दीड वर्षात १४८ मुले गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात ९३ अल्पवयीन मुली व ५५ मुलाचा समावेश आहे. यांपैकी डोंबिवली पोलिसांना ८४ अल्पवयीन मुली व ५४ मुलाना शोधून काढण्यात यश आले आहे.
९ अल्पवयीन मुलीं व १ मुलागा अजूनही गायब असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र पोलिसांना कौटुंबिक वाद, नैराश्य , भूलथापा तसेच लग्नाचे प्रलोभन , प्रेम प्रकरण या मुळे या अल्पवयीन मुली घरातून निघून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अल्पवयीन मुलगी पळून जाताना मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर येत आहे.

पालकांनी आपल्या घरात अल्पवयीन मुलं किंवा मुलींबरोबर मैत्रीच्या नात्याने राहत शाळेत किंवा कॉलेजमध्ये ती काय करते व तिचे विचार काय आहेत याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितले. पालकांनी आपल्या मुलांची आपण काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.