दौंड, पुणे : दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. इतकंच नाही, तर स्वतःच काही दिवसांपासून आपला नवरा हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील भांडगाव येथे हा प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात शीतल सुनील जगताप आणि तिचा बॉयफ्रेण्ड अतुल प्रभाकर चौगुले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून भांडगाव येथे सुनील जगताप आणि शितल जगताप हे दाम्पत्य राहत होते. शितल जगताप हिचा नवरा सुनिला दारु पित असे. त्यातच शीतल आणि गावात राहणारा अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने शितल जगताप व तिचा प्रियकर अतुल चौगुले या दोघांनी १५ मे २०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुनिल जगताप घरासमोर झोपलेला असताना डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

Kolhapur Murder : आईची मध्यस्थी तोकडी पडली, आधी वडिलांचा खून, नंतर मुलानेही आयुष्य संपवलं
त्यानंतर पत्नी शीतल हिने बुधवारी ( १७ मे ) रोजी यवत पोलीस ठाण्यात आपला पती सुनील जगताप हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१८) या बेपत्ता असलेल्या सुनील जगताप याचा घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला. यवत पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला बोलवून घेत विचारपूस केली. पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर दोघांनी संगनमताने त्याचा खून केल्याचे समोर आले. तसेच खून करून त्याचा मृतदेह विहीरीत टाकला, तर रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

CCTV : टॅटूने जीव घेतला, BMW कार ट्रकवर धडकली, मुंबईत २९ वर्षीय एअर हॉस्टेसचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here