अमेरिकेच्या तळावरील हल्ले यशस्वी
आज अमेरिकेच्या तळांवर ईराणच्या शूर आणि साहसी सैनिकांनी यशस्वी आक्रमण केल्याचे खामनेई यांनी ईश्वराचे नाव घेत म्हटले. आमचा संघर्ष सतत सुरूच असून आम्ही शक्तीशाली सत्तांविरोधात संघर्षासाठी एकजूट होत आहोत. कधीही दुर्बल होणार नाही आणि कधीही हार मानणार नाही, असे खामनई म्हणाले. ईराणसोबत जे काही झाले ते कधीही विसरता येणारे नाही, असेही ते पुढे म्हणाले.
‘सुलेमानी यांचे योगदान मोठे’
खामनेई यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांच्या हातामध्ये सुलेमानी यांची छायाचित्रे होती. सुलेमानी यांच्या आठवणी सांगताना खामनेई भावुक झाले होते. सुलेमानी हे महान असे साहसी व्यक्ती होते. त्यांनी दहशतवादाविरोधात संघर्ष केला. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहा, त्यांनी ईराणी मूल्यांचा नेहमीच पुरस्कार केला. सुलेमानी हे प्रेरणास्त्रोत होते. तसेच ते महान देशभक्त होते. आज अमेरिकेच्या तळांवर हल्ला करत अमेरिकेच्या अहकारावर आम्ही थप्पड लगावली आहे, असे खामनेई म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times