वाशिम: समृद्धी महामार्गावर सुरू असलेले अपघाताचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. आज पहाटे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात दोनद जवळ चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शुक्रवार, १९ मे रोजी नखाते आणि करंडे कुटुंबीय तुळजापूरवरून नागपूरला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी सकाळी ५ च्या सुमारास कारंजा टोल प्लाजा ते दोनद दरम्यान त्यांच्या गाडीने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही कुटुंब हे तुळजापूर येथील असून ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपूरला जात होते.

लग्नाच्या तीन महिन्यानंतरही पतीचा मधुचंद्राला नकार, सासूने विचारताच जावयाचं हादरवणारं उत्तर
अपघातानंतर मंगरूळपीर येथील गजानन मिटकरे हे नागपूरला जात असताना त्यांनी तात्काळ गाडी थांबवून जखमींना आपल्या गाडीमधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर उर्वरीत लोकांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद अकबानी यांना प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठवण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; काम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळला

या अपघातात सचिन नखाते (वय ४८), छाया विष्णू करंडे (वय ५४), सोनाक्षी सचिन नखाते (वय १२), तेजस्विनी अनुराग करडे (वय २८), मल्हार नखाते (वय ४), कृष्णा अनुराग करंडे (वय ५), आरती सचिन नखाते (वय ४०), विष्णू करंडे (वय ६५) हे जखमी झाले असून सर्वजण एकाच कुटूंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात १६ वर्षांचा पोरगा गेला, शवविच्छेदन अहवालात भलतंच, अशी सॉल्व्ह झाली Murder Mystery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here