कोल्हापूर : करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमधील मोजदादचं काम पूर्ण झालं असून अंबाबाई भक्तांनी आई अंबाबाई चरणी तब्बल १ कोटी ७२ लाखांचे दान अर्पण केले आहे. १० मेपासून हे मोजदादचं काम सुरू करण्यात आलं होतं.

अंबाबाई मंदिरात ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. दीड ते दोन महिन्यातून एकदा या दानपेट्या उघडल्या जातात. यावेळी पेटीतील मोजदादची सुरुवात १० मेपासून करण्यात आली असून दररोज दोन याप्रमाणे दानपेट्या उघडल्या गेल्या. १० मे रोजी पहिल्या दिवशी ३८ लाख ४३ हजार ३२८ रूपये, ११ मे रोजी ३८ लाख ३९ हजार ८०९ इतक्या रकमेचं मोजदाद पूर्ण झालं. बुधवारी सायंकाळी दानपेटीतील सर्व रक्कम मोजून झाल्यानंतर भक्तांनी अंबाबाईचरणी तब्बल १ कोटी ७२ लाख रुपयांचे दान अर्पण झाले.

मला फरक पडत नाही…शतकानंतर स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर विराटचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, पाहा VIDEO
अंबाबाई चरणी भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. १० मेपासून या मोजदादचं काम सुरू करण्यात आलं असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली हे दान मोजण्यात आलं. यासाठी ३०हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक कोल्हापुरात दररोज दाखल होतात. मात्र, मंदिर परिसरात महिला शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाचा तडाका असल्याने मंदिर प्रशासनाने सभोवताली मंडप उभारला आहे. मात्र, भाविकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची अजूनही कमतरता दिसून येत आहे.

हेनरिक क्लासेनने शतक झळकावताच SRH मालकिणीची रिअ‍ॅक्शन चर्चेत, इमोशनल झाली काव्या मारन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here