सांगली: जिल्ह्यात बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखा अधिकारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने केलेल्या तपासणीत ७२ पैकी ५५ बिलांमध्ये, तीन लाख २१ हजार रूपयांची तफावत असल्याचे आढळले आहे. ही रक्कम तातडीने परत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याबाबत , कुल्लोळी हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, घाडगे हॉस्पिटल, सेवासदन आणि मेहता हॉस्पिटल यांना बिलातील तफावतीबद्दल १८ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ( )

वाचा:

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांनाही रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयातील बिलांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. या पथकाच्या पडताळणीत खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार समोर येत आहे. या पथकाकडून नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयू रूमचे भाडे, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सिजन, औषधे आदींच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. या तपासणीत ५५ बिलांमध्ये तफावत आढळू आली. याबाबत जिल्ह्यातील सहा रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ७२ पैकी ५५ बिलांमधील तीन लाख २१ हजार रुपयांची पावतीची रक्कम रुग्णांना परत देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

वाचा:

प्रशासनाच्या नोटिशीनंतर मिरज मधील सेवासदन आणि कुल्लोळी हॉस्पिटल यांनी ज्यास्तीची रक्कम परत केली आहे. सेवासदन हॉस्पिटलने एका रुग्णाकडून जादा घेतलेले ४१ हजार रुपये परत केले, तर कुल्लोळी हॉस्पिटलने एका रुग्णाकडून जादा घेतलेले सहा हजार रुपये परत केले आहते.

दरम्यान, कामावर न येणाऱ्या नर्सिंग स्टाफवर तात्काळ गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र भरमसाठ बिल घेणारे किंवा रुग्णसेवा देण्यात टाळाटाळ करणाऱ्या खासगी डॉक्टरना फक्त नोटिसा का? नर्सेसना एक न्याय आणि डॉक्टरना वेगळा न्याय का? अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते करत आहेत.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here