रायगड,दिवेआगर: कोकणात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मात्र. अशातच दिवेआगर परिसरात एका छोटया मुलाचा रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये पडून त्याचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आता व्हिडिओ समोर आला आहे. आविष्कार येळवंडे असे या चिमुकल्याचे नाव आहे वडिलांची नजर चुकवून हा चिमुकला स्विमिंग पूकडे गेला होता यावेळी ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांची ही लक्ष ठेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.

गुरुवारी १८ मे रोजी एका ४ वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिवेआगरमध्ये घडली होती. आविष्कार येळवंडे असे या चिमुकल्याचे नाव होते. मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील खेड – सावरदारी येथील अविनाश येळवंडे यांचे कुटुंब कोकणात दिवेआगारच्या इलाईट रिसॉर्टमध्ये आले होते. याठिकाणी आल्यानंतर हे कुटुंब दिवेआगर समुद्रावरही फिरून आले होते. त्यामुळे सकाळी वडील आपली गाडी धुण्यासाठी खाली आले होते. यावेळी गाडी धुताना त्यांच्यासोबत खाली आलेला छोटा अविष्कार त्यांच्यापासून नजर चुकवून दूर जाऊन रिसॉर्टच्या स्विमिंग पूल परिसरात एकटाच फिरत होता. थोड्या वेळाने त्याची शोधाशोध सुरु झाल्यावरती तो वडिलांना त्याचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये तरंगत असलेला दिसला. त्याला तात्काळ जवळच्या बोर्ली पंचतन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला तपासून मृत घोषित केले.

Sambhaji Nagar: देवाचा जागर करण्यापूर्वी अनर्थ; चिमुकला शेततळ्यात पडला, वाचवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रिसॉर्टमध्ये नेमकं काय घडलं?

आविष्कार येळवंडे वडिलांची नजर चुकवून तो स्विमिंग पूलमध्ये गेला, पूलमध्ये पाय टाकून बसला होता. त्यातच पाण्यात उतरण्याचा मोह त्याला झाला. मात्र, स्विमिंग पूल त्याच्या उंची पेक्षा खूपच जास्त खोल होता. त्यामुळे काही वेळातच तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हात पाय मारून त्याने अनेकदा पुलच्या कठड्यापर्यंत पोचायचा केविलवाणा प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो निष्फळ ठरला. त्या निष्पाप जीवाला तिथपर्यंत पोचणे शक्य झालं नाही. या दुर्दैवी घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने अविष्कार नक्की तिथे कसा गेला याचा आता व्हिडिओ समोर आला आहे.

उबर गाडीने मावशीसोबत फिरायला आला, धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरला, डोळ्यासमोर घडले धक्कादायक

व्हिडिओतील आविष्कारची जीव वाचवण्यासाठीची केविलवाणी धडपड पाहून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अविष्कार कसा गेला कधी पडला, हे देखील अविनाश यांच्याही लक्षात आले नाही. या सगळ्या घटनेची नोंद दिघी सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पर्यटकांनी आपल्या सोबत असलेल्या लहान मोठ्या मुलांची काळजी जबाबदारीपूर्वक घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडू शकतात त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी असं स्पष्ट मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या दुर्देवी घटनेने येळवंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here