प्रदिप भणगे, मुंबई : उल्हासनगरात एका महिला डॉक्टरने नवजात बाळाच्या खरेदी विक्रीचा बाजार मांडल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी महिला डॉक्टरसह एकूण चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील कंवरराम चौक परिसरात डॉक्टर चित्रा चैनानी यांचं महालक्ष्मी नर्सिंग होम आहे. याठिकाणी नवजात बालकांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांची मदत घेत एक बनावट ग्राहक तयार केली आणि तिला मुलगा हवा असल्याचं डॉक्टर चित्रा चैनानीला सांगितलं.

त्यानुसार या डॉक्टरने नाशिकहून आलेल्या एका महिलेचं २२ दिवसांचं बाळ या महिलेला दाखवलं आणि सात लाख रुपये किंमत सांगितली. हा सौदा केला जात असतानाच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत डॉक्टर चैनानी आणि विक्रीसाठी आणलेल्या बाळाच्या आईला ताब्यात घेतलं.

साहेब टेम्पो उभा आहे, खबर पक्की आहे-खबऱ्याचा कॉल, पोलिसांनी छापा टाकला अन् माल हाताला लागला!
ठाणे क्राईम ब्रँच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे झाले. याठिकाणी ज्यांना बाळ नको आहे, आणि ज्यांना बाळाची गरज आहे, अशांची गाठभेट करून देत मध्यस्थ म्हणून डॉक्टर चैनानी काम करत होती. तसंच जितक्या लाखात सौदा झाला आहे, त्यापैकी जवळपास अर्धे पैसे तिला मिळत होते.

मुलाचा आणि मुलीचा रेट वेगवेगळा होता, असे अनेक धक्कादायक खुलासे तिच्या चौकशीतून झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात डॉक्टर चित्रा चैनानी हिच्यासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

प्रवाशांची ट्रेनमधून उतरण्याची घाई, एक जण टॉयलेटच्या दाराजवळ गेला, समोर जे पाहिलं त्याने सगळेच भयभीत
दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here