जयपूर : राजस्थान विधानसभा अधिवेशनाला अखेर सुरूवात झालीय. अधिवेशनाला सुरुवात होताच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत सदनाचं कामकाज १.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरु होताना काँग्रेसकडून गेहलोत सरकारमध्ये कायदे आणि संसदीय कार्य मंत्री यांनी सदनात विश्वास ठराव सादर केला. दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्यात आलेला दिसला. आता सचिन पायलट यांना आसन क्रमांक १२७ देण्यात आलाय. ते आता मुख्यमंत्री यांच्या बाजूला नाही तर अपक्ष आमदारांसोबत बसलेले दिसत आहेत. यावर बोलताना ‘मला विरोधी पक्षाजवळ यासाठी बसवण्यात आलंय कारण सीमेवर नेहमी सर्वात शक्तीशाली योद्ध्यालाच पाठवलं जातं. जेव्हापर्यंत मी बसलोय तेव्हापर्यंत सरकार सुरक्षित असल्याचं’ पायलट यांनी विधानसभेत म्हटलंय.

काँग्रेसशी बंडखोरी करणारे आणि पुन्हा पक्षात दाखल होणारे सचिन पायलट आता राज्य सरकारमध्ये मंत्री नाहीत. बंडखोरीची शिक्षा म्हणून पक्षानं कारवाई करत पायलट यांना उप मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजुला केलं होतं. सचिन पायलट आता उपमुख्यमंत्री नसल्यानं त्यांच्या जागेत बदल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. सचिन पायलट यांना अपक्ष आमदार संयम लोढा यांच्या बाजुचं आसन देण्यात आलंय. तर, सचिन पायलट यांच्या जागेवर अशोक गेहलोत यांच्या बाजुच्या आसनावर संसदीय कार्य मंत्री शांति धारीवाल यांना जागा देण्यात आलीय.


संबंधित बातम्या :वाचा :

वाचा :

वाचा :

यावर, सदनात आपल्या भाषणाला सुरुवात करताना, ‘आज जेव्ही मी सदनात आलो तेव्हा पाहिलं की मला मागचं आसन दिलं गेलंय. मी शेवटच्या रांगेत बसलोय. मी राजस्थानातून आहे, जे पाकिस्तानच्या सीमारेषेवर आहे आणि सीमेवर नेहमी सगळ्यात मजबूत जवानालाच तैनात केलं जातं. जेव्हापर्यंत मी इथे बसलोय तेव्हापर्यंत सरकार सुरक्षित आहे’, असं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी विधिमंडळात म्हटलंय.

सचिन पायलट यांच्यासोबत राज्य सरकारमधले आणखीन दोन मंत्र्यांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यामुळे, विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांच्याही आसन क्रमांकात बदल करण्यात आलाय. आता १४ व्य नंबरच्या सीटवर विश्वेंद्र सिंह तर पाचव्या रांगेत ५४ क्रमांकाचं आसन रमेश मीणा यांना देण्यात आलंय.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here