नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या वैज्ञानिक सर्वेक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगसह वैज्ञानिक सर्वेक्षणाला नकार देत पुढे ढकलले आहे. सुप्रीम कोर्टाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयचाय्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.अधिक माहितीनुसार, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कार्बन डेटिंगच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास गुरुवारी मान्यता दिली. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमधील कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. हे शिवलिंग किती जुनं आहे हे याने कळू शकतं असं हायकोर्टाचं म्हणणं होतं. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला ज्ञानवापी मशिद व्यवस्थापन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होतं.

रेल्वे स्थानकात १४ वर्षीय मुलीला दामिनी पथकाने घेरलं, बॅगेत सापडले पैसे अन् दागिने; सत्य कळताच चाट पडले…
हुजेफा अहमदी यांनी मशिद व्यवस्थापन समितीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणावर लवकर सुनावणी होण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली. यानुसार सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी देत वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. त्यावर हे संपूर्ण प्रकरण सुरू आहे.

कांद्याच्या वखारीत सुरू होता भलताच खेळ; पोलिसांनी सापळा रचून टाकला छापा; पाहताच फुटला घाम

मशिदीच्या आवारामधील वाळूजच्या जागेवरून वाद…

ज्ञानवापी मशिदीमध्ये वाळूजच्या परिसरामुळे मोठा वाद आहे. तिथं शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षांने केला आहे. खरंतर, हिंदू पक्षांनी ज्ञानवापी मशिद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. इतकंच नाहीतर मशिद परिसराच्या भिंतीला लागून आई शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगीदेखील मागण्यात आली होती. यावरून हे हिंदू मंदिर आणि हिंदू देवतांचे स्थान असल्याचा अर्ज वाराणसी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने सर्वेक्षण आयोगाची स्थापना केली होती. त्याचा अहवाल १९ मे २०२२ रोजी आला.

दुसरीकडे मुस्लिम पक्षाकडून हे शिवलिंग नसून एक कारंजा असल्याचं सांगण्यात आलं आहे. मशिद समितीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून हिंदू पक्षाच्या सर्वेक्षणाला आव्हान दिलं. सप्टेंबर २०२२ मध्ये, वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी परिसरात हिंदू महिलांच्या पूजेच्या अर्जाला आव्हान देणारा अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचा अर्जही फेटाळला होता. त्यामुळे भविष्यात या कथित शिवलिंगाचं सत्य समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Success Story : नोकरी सोडून भंगारातून कमावले २०० कोटी, पठ्ठ्याच्या छोटाशा स्टार्टअपने चमत्कारच केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here