सुरत : गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय असलेले बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री हे गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि राजकोट इथे दिव्य दरबार भरवणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्याआधीच दरबाराला गुजरातमधून विरोध होताना दिसत आहे. यावर सुरतच्या एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याने धीरेंद्र शास्त्री बाबांना मोठं आव्हान केलं आहे. त्यामुळे हा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे.हिरे व्यापाऱ्याने आव्हान दिलं आहे की, जर मला बाबांनी त्यांच्या दैवी दरबारामध्ये बोलावलं तर मी त्यांना पॉलिश केलेल्या हिऱ्यांचं पाकीट घेऊन जाईन. त्या पाकिटात किती हिरे आहेत हे जर मला बाबांनी सांगितलं तर मी ते हिरे त्यांच्या चरणी ठेवीन. मी त्यांना शरण जाईन आणि त्यांच्या दैवी शक्तीचा स्विकार करीन, असंही या हिरे व्यापाऱ्याने म्हटलं आहे. Triple Murder: आई-वडील अन् आजीचा हॉकी स्टिकने खून, ४८ तास मृतदेह सॅनिटायझरने जाळला; मस्त शॉपिंग केली अन्…
बागेश्वर सरकारच्या या दरबारला करणार विरोध…
व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ तारखेपासून ते गुजरातमध्ये होणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या दैवी दरबाराला विरोध करण्यासाठी जाणार आहे. २६ आणि २७ मे रोजी या दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या दरबारामध्ये चमत्कार, अंधश्रद्धा आणि त्यांच्या दैवी शक्तीचं प्रदर्शन केलं जाईल. पण लोकांनी आणि व्यापाऱ्याने याला स्पष्ट विरोध केला आहे.
कार्यक्रम रद्द करण्याची मागणी…
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारामध्ये लोक मोठी गर्दी करताना दिसतात. त्यामुळे सरकारपण यासाठी परवानगी देत आहे. पण हे अयोग्य असून याविरोधात सरकारला पत्र लिहणार असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली आहे. सुरत, अहमदाबाद आणि राजकोट इथल्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही व्यावसायिकाने सांगितले.