एक लाख रुपयांची नोट कधी आणि का आली?
अधिक माहितीनुसार, १ लाख रुपयांची नोट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारच्या काळामध्ये छापण्यात आली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता तर सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्यात आला होता. ही नोट आझाद हिंद बँकेने जारी केली होती. या बँकेची स्थापनाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. जी रंगून बर्मा म्हणजेच म्यानमारला होती.
या बँकेला बँक ऑफ इंडिपेंडन्स असंही म्हटलं जात होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बँक खास देणग्या गोळा करण्यासाठी तयार करण्यात आली होती, जी भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी भारताला देण्यात आली होती. याचवेळी १ लाख रुपयांची नोट जारी करणाऱ्या आझाद हिंद बँकेला जगातील १० देशांचा पाठिंबा देण्यात आला होता.
आझाद हिंद सरकारच्या समर्थनार्थ ब्रह्मदेश, जर्मनी, चीन, मंचुकुओ, इटली, थायलंड, फिलीपिन्स किंवा आयर्लंडने या बँकेच्या चलनाना मान्यता दिली होती. तर दुसरीकडे नोटेच्या बनावटीबद्दल बोलायचं झालं तर एका बाजूला सुभाषचंद्र बोस यांचे चित्र छापण्यात आले आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या चित्रावर स्वतंत्र्य भारत असं लिहण्यात आलं होतं.
नेताजींच्या ड्रायव्हरने दिली होती १ लाखाच्या नोटेची माहिती…
आझाद हिंद बँकेने ५००० च्या नोटेची माहिती सार्वजनिक केली होती, त्यातील एक नोट अजूनही BHU च्या भारत कला भवनात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, नेताजींचे ड्रायव्हर असलेले कर्नल निजामुद्दीन यांनीच एका मुलाखतीदरम्यान एक लाखाच्या नोटेबाबत सांगितले होतं. इतकंच नाहीतर, नेताजींच्या पणतू राज्यश्री चौधरी यांनी नुकतेच विशाल भारत संस्थानला एक लाखाच्या नोटेचे चित्र उपलब्ध करून दिल्याने ही गोष्ट अधिकच पुष्टी झाली.