जयपूर : राजस्थान राजकारणाचा नवा अध्याय आजपासून सुरू होतोय. अनेक प्रयत्नांती विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आल्यानं काँग्रेसमध्ये आनंद आणि उत्साह आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही सदनात सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. बसपा आमदारांच्या विलय प्रकरणावरच्या स्थगिती अर्जावर सुनावणी गुरुवारी टळली. त्यानंतर आज राजस्थान उच्च न्यायालय यावर निर्णय घेऊ शकतं. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देण्यावर याअगोदरच नकार दिलाय. अधिवेशनाची कार्यसूची तयार करण्यासाठी विधानसभेच्या बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीची बैठक होईल. बहुमत चाचणी सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आज विधासभेत विश्वास ठराव मांडण्याच्या तयारीसोबतच आठ नवे अध्यादेश मांडले जाणार आहेत. विधानसभेत यावर अध्यादेशांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये करोना, किटक हल्ला यांसारखे अनेक विषयांचा समावेश आहे.
(अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा)

अपडेट ०४.१० वाजता

मुख्यमंत्री सरकार राजस्थान विधानसभेत बहुमताच्या चाचणी परीक्षेत यशस्वी ठरलंय.

अपडेट १.०० वाजता

– सरकारकडून विश्वासदर्शक ठरावासोबतच भाजपनं यू-टर्न घेतला. नेते आणि विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ‘भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार नसल्याचं’ म्हटलंय.

– राजस्थानचे कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांची राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडलाय. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच गेहलोत सरकारकडून हा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.

अपडेट ११.०० वाजता

राजस्थान विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडून देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती दोन मिनिटांचा शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सदनाच्या कामकाजाला १.०० वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आलीय.

विधानसभा अधिवेशनासाठी अशोक गेहलोत गटाचे आमदार बसमध्ये दाखल झाले तर पायलट गटाचे आमदार आपापल्या गाड्यांनी विधिमंडळात पोहचले

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

राजकीय संकट आणि काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बसपा आमदार प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी या दरम्यान बसपाकडून आपल्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. या व्हिपद्वारे बसपानं आपल्या सहा आमदारांना अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसविरुद्ध मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी, ‘मुख्यमंत्री अशोक गहलोत, पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाळ, प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासोबत आमदारांच्या बैठकीत सहभाग घेतला. राजस्थानच्या जनतेच्या हित आणि दिलेल्या आश्वासनांनुसार कार्य करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत’ असं ट्विट यांनी बैठकीनंतर केलं होतं.

गुरुवारी, सचिन पायलट आपल्या सर्व समर्थक आमदारांसहीत मुख्यमंत्री अशोक गहलोत निवासस्थानी भेटीसाठी दाखळ झाले. विधानसभा अधिवेशनापूर्वी आज आपली भेट घ्यावी असे अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना निरोप धाडला होता. त्याला प्रतिसाद देत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या अर्धा तास आधीच पायलट यांनी गहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राजस्थानातील सत्तासंघर्षादरम्यान अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांची ‘तात्पुरती’ का होईना पण दिलजमाई गहलोत सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जात आहे.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here