नवी दिल्ली: भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त () देशातील एकूण ९२६ पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पुरस्कारप्राप्त एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांचा समावेश आहे. यांमध्ये महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘’, १४ पोलिसांना शौर्य पदके (Gallantry Awards), तर प्रशंसनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना ‘पोलीस पदक’ देण्यात आली आहेत. (total 926 police personnel have been awarded medals)

एकूण देशातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या गौरवाचा विचार करता, पोलिसांच्या उल्लेखनीय पराक्रमाबाबत एकूण २१५ पोलिस कर्मचार्‍यांना शौर्य (पीएमजी) देण्यात आली आहेत (). तर विशेष सेवेसाठी एकूण ८० राष्ट्रपती पोलिस पदके (President’s Police Medals for Distinguished Service) आणि गुणवंत सेवेसाठी (Police Medal for Meritorious Service) एकूण ६३१ पोलिस पदके प्रदान करण्यात आले आहेत.

देण्यात आलेल्या एकूण २१५ शौर्य पुरस्कारांपैकी १२३ पुरस्कार हे जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष कामगिरीसाठी, २९ पुरस्कार हे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी, तर ८ पुरस्कार हे ईशान्य भारतातील कामगिरीसाठी देण्यात आले आहेत.

वाचा ही बातमी:

प्राप्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये ५५ जवान सीआरपीएफचे (The Central Reserve Police Force) आहेत. तर ८१ जवान हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे, २३ उत्तर प्रदेश पोलिस दलातील, आणि १४ पोलिस दलातील आहेत. तसेच १६ दिल्ली पोलिस दलातील, तसेच १२ झारखंड पोलिस दलातील आहेत. उर्वरित पोलिस कर्मचारी हे राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि आणि केंद्रीय पोलिसांच्या सशस्त्र दलांमधील (Armed forces) आहेत.

ही महत्वाची बातमी वाचा:

ही बातमी देखील वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here