रत्नागिरी, संगमेश्वर : नुकताच अकरावीची परीक्षा पास होऊन बारावीला गेलेल्या एका महाविद्यालयीन युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तीवरे ढवळवाडीत घडली आहे. श्रेयस रवींद्र ढवळ (वय १७ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे.श्रेयस हा काजळी नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रेयस हा रत्नागिरी येथे शिक्षण घेत होता. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने तो गावी आला होता. श्रेयस हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने ढवळ कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे
श्रेयस हा रत्नागिरी येथे शिक्षण घेत होता. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने तो गावी आला होता. श्रेयस हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने ढवळ कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे
नुकतीच त्याने अकरावी परीक्षा पास होऊन बारावीला प्रवेश घेतला होता. अत्यंत मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी म्हणून तो सगळ्यांना परिचित होता. गुरुवारी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती साखरपा पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंब-मित्र परिवारासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. याबाबतची खबर साखरपा पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी वैभव कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शुक्रवारी सकाळी 6 वाजता श्रेयस याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या घटनेची नोंद साखरपा भाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास साखरपा पोलीस करत आहेत.