मुरबाड : पुत्रवियोगाचं दुःख बाजूला ठेवत मुरबाडमधील पालकांनी आपल्या चिमुकल्याचं नेत्रदान केलंय. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पालकांनी घेतलेल्या या निर्णयानं उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आलं.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील टोकावडे जवळ असलेल्या फांगळोशी गावात फनाडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. या कुटुंबातील संदेश फनाडे हा १३ वर्षांचा मुलगा काल सकाळी घराच्या ओसरीत बसलेला असताना त्याला विषारी नागाने दंश केला.

ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला आधी जवळच असलेल्या धसई गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र तिथे सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला टोकावडे इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दुर्दैवानं तिथेही सर्पदंशावरील उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं.

टोकावडे ते उल्हासनगर हा जवळपास ५० किलोमीटरचा प्रवास करून हे कुटुंब संदेशला घेऊन उल्हासनगरला दाखल झालं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पाच वर्षांच्या चिमुकल्यावरुन बैलगाडा गेला, बैलाने तुडवलं, कोकणात शर्यतीदरम्यान भीषण घटना
यानंतरही खचून न जाता पुत्रवियोगाचं दुःख बाजूला सारत फनाडे कुटुंबियांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांचा मृत मुलगा संदेश याचे डोळे दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या सहाय्याने संदेशचं नेत्रदान करण्यात आलं.

भयानक! विषारी घोणस सापाला भक्ष करणारा नाग; व्हिडीओ व्हायरल

आमचा मुलगा तर गेला, मात्र किमान त्याचे डोळे जिवंत राहतील आणि त्यातून दोन नेत्रहीनांना दृष्टी मिळेल, अशी भावना संदेश याचे काका नरेश पन्हाळे यांनी व्यक्त केली. तर मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांनीही फनाडे कुटुंबीयांच्या या निर्णयाचं कौतुक केलं.

आधी मद्यपान, मग समलिंगी संबंध; नागपुरात ४५ वर्षीय गे पार्टनरची हत्या,२३ वर्षीय तरुणाला अटक

दुसरीकडे, कल्याण पूर्वे येथील कोळसेवाडी परिसरात सर्पदंशाने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमित सोनकर (वय १५) असं या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. शाळेला सुट्टी असल्याने अमित बुधवारी वडिलांच्या ज्यूस सेंटरवर गेला होता. तेथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमितला सापाने दंश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here