काठमांडू: नेपाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक अल्ताफ हुसैन अन्सारी याला १५ किलो सोन्याच्या तस्करीत अटक करण्यात आली आहे. परसाचे डीएसपी मंजीत कुंवर यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर अन्सारीला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी अन्सारीला काठमांडूला पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय एका भारतीय नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ अन्सारी या बनावट भारतीय नोटांच्या तस्करीची एक टोळी चालवतो.

काठमांडू रेंजचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्याम लाल ज्ञवली यांनी सांगितले की, निलेश शकीय आणि संजय पटेल हे दोन भारतीय १५ किलो बनावट सोन्याच्या तस्करीचे मास्टरमाइंड आहेत. अन्सारी हा मुख्य डीलर होता आणि या दोघांना नेपाळमध्ये मदत करत होता. शकियाला एक दिवस आधीच अटक करण्यात आली होती. तर, अन्सारी फरार होता. आता अन्सारीलाही अटक करण्यात यश आले आहे. मात्र, पटेलला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

ज्ञवली यांनी सांगितले की, हे तस्कर चांदीवर सोन्याचा थर लावून भारतात पाठवत असे. हे सोने गुजरातमध्ये ही जाणार होते. त्या ठिकाणी आरोपींकडून खरे सोनं असल्याचे सांगून विक्री करण्यात येणार होती. या तस्कारांनी नेपाळमध्येच सोन्याने भरलेली बॅग फेकून देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी एक समिती स्थापन करून या प्रकरणाची आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली.

वाचा:

शिपाई बहादूर सिंग काद्यात आणि शिपाई प्रसन्न शेठ यांनी आपले वरिष्ठ डीएसपी रंजन कुमार दहल यांना चुकीची माहिती दिली. त्याशिवाय तस्करीबाबत पूर्ण माहिती दिली नसल्याचेही समोर आले. या प्रकरणी आठ पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्ञवली यांनी सांगितले की, भारतातील गुन्हेगारीत अन्सारीचा सहभाग असणाऱ्याची शक्यता आहे.

वाचा:

अन्सारी २०१० मध्ये भारतात बनावट चलनी नोटांच्या प्रकरणी तीन वर्षांसाठी तुरुंगात गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अन्सारी हा आयएसआयच्या व सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख आहे. या नेटवर्कचा वापर आयएसआय बांगलादेश ते काठमांडूमध्ये बनावट नोटा नेण्यासाठी करते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here