या महिलेने आमदारांविरोधात केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणाची सध्या न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अचानक या महिलेने आरोप मागे घेत असल्याबद्दलचे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यामुळे सर्वप्रथम चौहान यांना पोलिस संरक्षण देण्याची आणि या महिलेची नार्को चाचणी करण्याची मागणी मी पोलिसांकडे करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. याशिवाय या प्रकरणात आमचे नाव कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी मी न्यायालयातदेखील जाणार असल्याचे चौगुले म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की विजय चौगुलेला लक्ष्य करायचे, असे काही जणांचे धोरण आहे. कोणत्या तरी प्रकरणात विजय चौगुले यांचे नाव आले म्हणजे निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असे समजायचे, असा आरोप चौगुले यांनी केला.
तक्रार मागे घेतान महिला काय म्हणाली?
ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, ही तक्रार मागे घेताना दीपा चौहान यांनी मंदा म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमदार गणेश नाईक यांच्याशी माझ्या वडिलांचे व भावाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. मला समाजसेवेची आवड असून त्यानिमित्ताने माझी मंदा म्हात्रे यांच्याशी माझा परिचय झाला. मंदा म्हात्रे यांनी त्यांचे राजकीय विरोधक गणेश नाईक यांच्याविरोधात खोटे बलात्काराचे तसेच मुलाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली, असे खोटे आरोप करण्यास सांगत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. विजय चौगुले यांच्याशी माझी ओळख करून दिली. चौगुले यांनी एका वकिलाला बोलावले त्यांचे नाव मला आठवत नाही गणेश नाईक यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह दाखल करून त्यांची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करायचे अशा प्रकारची चर्चा त्या वकिलासमवेत चौगुले यांनी केल्याचा आरोप दीपा चौहान यांनी पोलिसांनी दिलेल्या पत्रात केला होता.