Karnataka Cabinet Minister List : सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यासोबत कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार हे समोर आलं आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी यादी जाहीर केली आहे.

 

हायलाइट्स:

  • कर्नाटकच्या नव्या सरकारचा आज शपथविधी
  • राज्यपाल थावरचंद गेहलोत शपथ देणार
  • ८ नेत्यांना पहिल्या टप्प्यात शपथ
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार हे आज शपथ घेणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत पद आणि गोपनियतेची शपथ देतील. मुख्यमंत्र्यांसोबत कोण शपथ घेणार याची यादी समोर आली आहे. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सिद्धरामय्या यांना पाठवलेल्या पत्रात नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणं जी. परमेश्वर यांना संधी देण्यात आली असून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ


१. परमेश्वर
२. रामलिंग रेड्डी
३. के जे जॉर्ज
४. एम.बी. पाटील
५. ससतीश जारकीहोळी
६. प्रियांक खरगे
७. के.एच. मुनियप्पा
८. बी.झे. झमीर अहमद खान

सिद्धरामय्या यांचं सरकार कसं असेल?

के.सी. वेणुगोपाल यांनी सिद्धरामय्यांना पत्र लिहून नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुणाला संधी द्यायची याबाबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. मल्लिकार्जून खर्गे यांनी ८ नेत्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. हे आठ नेते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील. यामध्ये जी. परमेश्वरा, के.एच. मुनियप्पा, के.जे. जॉर्ज, एम.बी. पाटील. सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे, रामलिंग रेड्डी आणि बी.झेड, झमीर अहमद खान हे नेते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील.

सिद्धारामय्या की डी. के. शिवकुमार? कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याकडून खरगेंना फॉर्म्युला सादर

दिल्लीत बैठकांचं सत्र

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री पदी डी.के. शिवकुमार यांची निवड केल्यानंतरही काल देखील दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झाल्यानंतर दोन्ही नेते बंगळुरुमध्ये दाखल झाले होते. त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला होता. यानंतर दोन्ही नेते पुन्हा दिल्लीत दाखल झाले होते. काल, सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना देखील शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुणाला संधी? मल्लिकार्जून खरगेंनी तिढा सोडवला, शपथविधीची तारीख ठरली

प्रियांक खरगे यांच्या नावाची चर्चा

कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आठ आमदार शपथ घेणार आहेत. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांचाही समावेश आहे. प्रियांक खरगे यापूर्वीच्या सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत होते.
सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांचा आज शपथविधी सोहळा, बड्या नेत्यांना आमंत्रण, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे जिथे भाजपने सत्ता मिळवली आहे. गेल्या निवडणुकीत कर्नाटकातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नव्हते, मात्र यावेळीही येथे खरा खेळ होणार असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भातील सर्व बातम्यांचा आढावा येथे घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here