नवी दिल्ली : जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या शानदार बॅटिंगमुळे गेल्या काही दिवसांची दरवाढ भरून निघाली आहे. डॉलर गेल्या दोन महिन्यातील उच्चांकी पातळीवर व्यवहार करत असल्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. परिणामी भारतीय बाजारात दोनी मौल्यवान धातूंचे दर गडगडले आहेत. मौल्यवान सोन्याच्या किमतींनी अलीकडेच ६२ हजार प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला तर चांदीचा भाव ७८ हजार प्रति किलोवर पोहोचला होता. दरम्यान, आज जर तुम्ही सोने आणि चांदीची खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आधी दोघांचे नवीन दर तपासून घ्या.

सोने-चांदी आजचा भाव
लक्षत घ्या की आठवडाभरात सोने १,००० तर चांदी जवळपास ४,००० रुपयांनी गडगडली असून खरेदीदारांना खरेदी पर्वणी साधता येईल. मागील चार दिवसांपासून सोन्याच्या किमतीत १,००० रुपयांनी घसरली आहेत. गुडरिटर्न्सनुसार, २० मे रोजी सोन्याच्या भावात १० रुपयांची किंचित घसरण झाली तर आज २२ कॅरेट सोने ५५,९४० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेटचा भाव ६१,०१० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पडले आहेत.

GMS: घरात ठेवलेल्या सोन्यापासून करा दणदणीत कमाई, एका ​स्कीममुळे मिळेल पैसाच पैसा!
चांदीचीही पडझड
ibjarates.com नुसार आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. १८ मे रोजी एक किलो चांदीचा भाव ७१,८०८ रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, ६ मे रोजी एक किलो चांदीची किंमत ७८,२५० रुपये या विक्रमी उच्चांक पोहोचली होती. मात्र, त्यानंतर दरात सातत्याने घसरण सुरू असून सध्या चांदीच्या किमतीत जवळपास ४ हजारांची घट झाली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, तारीख लक्षात ठेवा! DA बाबत मोठी अपडेट, महागाई भत्ता या दिवशी जाहीर होईल
BIS केअर APP
दरम्यान, सोन्याच्या खरेदीच्या वेळी जर तुम्हाला सोनार फसवत असल्याची शंका आल्यास किंवा तुम्हाला स्वतः सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर एक हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. तुमच्या BIS Care ॲपवर हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here