म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगर विकास मंत्रिपद मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करणारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा तोतया स्वीय साहाय्यक नीरजसिंग राठोड (रा. मोरबी, अहमदाबाद) याने केवळ विदर्भातीलच आमदारांसाठी सापळे रचलेले नाहीत. झारखंडच्या एका खासदाराला फसविल्याप्रकरणी त्याच्यावर दिल्लीतही गुन्हा दाखल आहे. इतकेच नाही तर तो तोंडात खर्रा किंवा सुपारी ठेवून नड्डा यांचा हुबेहूब आवाजही काढतो.गुन्हे शाखेच्या पथकाने नीरजची चौकशी सुरू केली असून त्यातून हे सत्य बाहेर येत आहे. नीरज हा सराईत ठगबाग असून त्याने अनेकांना फसविले आहे.

झारखंडच्या एका खासदाराने त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत त्याच्यावर दिल्ली येथे गुन्हा दाखल करून त्यात त्याला अटकही झाली होती. जानेवारी महिन्यातच तो त्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला व त्याने परत हाच धंदा सुरू केला.

पाच वर्षांच्या चिमुकल्यावरुन बैलगाडा गेला, बैलाने तुडवलं, कोकणात शर्यतीदरम्यान भीषण घटना
त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो टाइल्सच्या एका कारखान्यात सर्वसाधारण पगारावर काम करीत असे. तेथे त्याला वीस हजार रुपये पगार होता, असे कळते. त्याचे कुटुंब आहे. मात्र, त्याचे कुटुंबीयांशी फार पटत नाही त्यामुळे तो वेगळा राहतो.

मोदींनी सांगूनही निवडणुकीत माघार घेतली नाही, जे पी नड्डांच्या वर्गमित्राचं डिपॉजिटच जप्त झालं

तो आंबटशौकीन असून स्त्रियांवर पैसा उधळण्यासाठीच तो हे उपद्व्याप करीत असल्याचे समोर आले आहे. ‘राजकारण्यांकडे बराच पैसा असतो, समुद्रातून एखादा तांब्या पाणी काढले तर कुणाला काय कळते’, असे तो बोलतो, अशी माहिती मिळाली.

आधी मद्यपान, मग समलिंगी संबंध; नागपुरात ४५ वर्षीय गे पार्टनरची हत्या,२३ वर्षीय तरुणाला अटक

1 COMMENT

  1. There are definitely lots of particulars like that to take into consideration. That is a nice level to deliver up. I supply the ideas above as normal inspiration but clearly there are questions like the one you carry up where the most important factor shall be working in trustworthy good faith. I don?t know if greatest practices have emerged round things like that, however I am positive that your job is clearly identified as a good game. Both girls and boys feel the influence of just a second’s pleasure, for the rest of their lives.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here