मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज वाढदिवस. सागरिकाने ‘चक दे इंडिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रीने क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. पण दोघांच्या लग्नाचा किस्सा आजही रंगून ऐकला जातो. फार कमी लोकांना माहीत आहे की, सागरिकाला पसंत करण्यासाठी झहीरच्या घरच्यांनी ‘चक दे इंडिया’ सिनेमाची सीडी मागवली होती.

झहीर खानने एका मुलाखतीत सागरिकाशी लग्न करण्याच्या निर्णयावर घरच्यांना फार मनवलं असल्याचं सांगितलं. झहीर म्हणाला की, ‘जेव्हा मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी सर्वात आधी ‘चक दे इंडिया’ सिनेमाची सीडी मागवली आणि पूर्ण सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला.’ असंच काहीसं सागरिकासोबतही झालं.

सागरिका म्हणाली की, घरच्यांना जहीर पहिल्यांदा आवडला नव्हता याचं मुख्य कारण ती नावाजलेला क्रिकेटर आहे. पण त्याचं मराठी ऐकून सर्वांनीच लग्नाला होकार दिला.

सागरिका पुढे म्हणाली की, ‘आम्ही दोघंही मराठी आहोत. पण मला मराठी बोलता येत नाही. तर जहीर उत्तम मराठी बोलतो. माझे घरातले सर्व क्रिकेट वेडे आहेत. माझे घरातले जहीरला उत्तम मराठी बोलता येतं यासाठी जास्त पसंत करतात. माझ्या आईलाही मराठी बोलता येत नाही. पण जेव्हा जहीर खान मराठीमध्ये बोलतो तिला फार आवडतं.’

सागरिका आणि जहीरने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. युवराज सिंग आणि हेजलच्या लग्नात दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहण्यात आलं होतं. जहीरला पाठिंबा देण्यासाठी सागरिका अनेकदा सामन्यांना गेली होती. दोघांनी सोशल मीडियावरच त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली होती.

लग्नानंतर सागरिका फारशी सिनेमांमध्ये दिसली नाही तर जहीर खाननेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता दोघंही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here