मुंबई: उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव यांनी घेतलेली पक्षाशी विसंगत भूमिका… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जाहीरपणे त्यांना लगावलेली फटकार आणि त्यानंतर अजित पवार यांनी पाळलेलं मौन… या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये काहीतरी घडत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अयोध्येतील राम मंदिर आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत घेतल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता होती. नेते व कार्यकर्तेही संभ्रमात होते. शरद पवार यांनी बुधवारी स्वत: पुढं येऊन हा संभ्रम दूर केला. पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं स्पष्ट करत ‘मी म्हणेन तीच भूमिका’ असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, पक्षातील ही कोंडी दूर करताना वेगळीच कोंडी निर्माण झाली आहे. पवारांच्या जाहीर वाक्यामुळं अजित पवार व पार्थ दुखावले गेल्याचं बोललं जात आहे.

वाचा:

पार्थ पवार हे काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पार्थ पवार यांचा कुणी वापर तर करत नाही ना, अशी शंका शिवसेनेनं आज उपस्थित केल्यानं त्यास बळ मिळालं आहे. पवार कुटुंबात व पक्षात कुठलाही वाद नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं असलं तरी अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातं. पार्थबद्दल पवारांनी जाहीरपणे इतके कठोर शब्द वापरणं त्यांना खटकल्याचं बोललं जातं. पवारांच्या त्या वक्तव्यानंतर पार्थ व अजित पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवारांशी चर्चाही केली होती. काल स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतरही राष्ट्रवादीतील बैठकांचे सत्र थांबताना दिसत नाही.

वाचा:

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या निवडक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अनिल देशमुख यांच्यासह इतर काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर यातील एकाही नेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादीच्या खात्याशी संबंधित कामानिमित्त ही बैठक होती, एवढंच सांगण्यात आलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here