छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीवर पैसे उडवण्यासाठी व स्वतः मौजमजा करता यावी यासाठी शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दुचाकीद्वारे ३०० ते ४०० किलोमीटर पळून जाणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला संभाजीनगर येथील गुन्हे शाखेने दिले बंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच लाख २८ हजाराचा मुद्देमाल व आठ मंगळसूत्रं चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपीच्या माध्यमातून आणखी काही मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सिताराम पाटेकर (रा. श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. श्रीरामपूर), अक्षय उर्फ आकाश राजू त्रिभुवन (रा. वैजापूर), राहुल गरडे (रा. भोकर, श्रीरामपूर) अशी त्याच्या साथीदाराची नावे आहेत.

धक्कादायक! डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक, दीड वर्षात ९३ अल्पवयीन मुली गायब, कारणेही समजली
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन, जवाहर नगर पोलीस स्टेशन, हरसूल पोलीस स्टेशन इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनसाखळीच्या घटना घडल्या होत्या.

दरम्यान शहरांमध्ये सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर, अमोल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. दरम्यान, उपनिरीक्षक दगडखेड आणि मस्के यांनी तांत्रिक तपास केला असता यामध्ये योगेश हा संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या समर्थ नगर येथील राहत्या खोलीवर छापा टाकला त्यावेळेस तो तेथे सापडला.

धक्कादायक! पुण्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू, परिसरात एकच खळबळ
दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने शहरात मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दोन चोरी केलेल्या दुचाकी व पाच लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, योग्य अशा साथीदाराकडून आणखी मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

योगेश ब्रँडेड कपडे वापरून मुलींना करायचा इम्प्रेस

योगेश याला ब्रॅण्डेड कपडे वापरण्याची सवय आहे. तो त्याच्या अंगात बँडेड कपडे आणि शूज असायचे. समाज माध्यमांवर देखील त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे शेकडो फॉलोवर्स असून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Tulja Bhavani: तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडचा आदेशच नाही, मग ते फलक लावले कोणी?, आता चौकशी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here