सातारा : येथील मल्हारपेठ- पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या संत सद्गुरू सुरूताई मठाजवळ कलेढोणकडून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीतील चालकाचा ताबा सुटल्याने तेथे असणाऱ्या रसवंतीगृहावर व रसवंतीगृह चालविणारी निर्मला धोंडीराम लिपारे (वय ४२) या महिलेला जोरदार धडक दिली. यात रसवंतीगृह चालवणारी महिला गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पाठवले असता हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.याबाबत घटनास्थळ व पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलेढोण (ता. खटाव) येथील साळुंखे मळ्यातील तुषार साळुंखे (चालक), राजाराम साळुंखे, नंदाताई साळुंखे, सुप्रिया साळुंखे व दोन लहान मुली हे स्विफ्ट डिझायर (एमएच १२ एसवाय ८४०४) या चारचाकी गाडीने घरात कार्यक्रम असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी मायणीत येत होते.

2000 Rs Note :पंतप्रधान मोदींना आवडत नाहीत २००० च्या नोटा,… पण का?; नृपेंद्र मिश्रांनी सांगितली अंदर की बात
गाडी मायणी अभयारण्याकडून संत सरुताई मठाकडे येताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि चालकाच्या विरुद्ध बाजूला मठाजवळ असलेल्या रसवंतीगृहाला व निर्मला धोंडीराम लिपारे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत या महिलेला उडवले असता ती गंभीर जखमी झाली. गाडी भरधाव वेगात असल्यामुळे ती उलटली.

१० वीची परीक्षी दिली, नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का
त्यावेळी मायणी व विखळे ग्रामस्थांनी तातडीची मदत करून संबंधित महिलेला पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवले. मात्र, हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला, तर गाडीतील सर्वांना बाहेर काढले असता सर्व सुखरूप होते.

घटनास्थळी पोलीस नाना कारंडे, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास बीट अंमलदार भूषण माने करीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News: दुचाकीस्वाराने सिग्नल तोडला; पोलिसाने लाथा बुक्क्यांनी तुडवला, व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here