मुंबई: अभिनेते आणि त्यांची घसघशीत कमाई हा नेहमी चर्चेचा विषय असतो. ”ने अलीकडेच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर केली. ही यादी १ जून २०१९ ते १ जून २०२० या काळात हिरोंनी केलेल्या भरभरुन कमाईवर आधारित आहे. विशेष म्हणजे या यादीत समावेश झालेल्या अभिनेत्यांची सर्वाधिक कमाई ही जाहिरातींमधून झाली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडचा एकमेव खिलाडी आहे, तो म्हणजे . या हिरोंच्या कमाईचे आकडे पाहिले तर तुमचेही डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

१. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ‘द रॉक’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ड्वेन जॉन्सन. ड्वेननं १ जून २०१९ पासून १ जून २०२० पर्यंत जवळपास ६५४ कोटी रुपयांची (८७.५ दशलक्ष डॉलर्सची) कमाई केली आहे.

२. हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्स यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं जवळपास ५३४ कोटी रुपये (७१.५ दशलक्ष डॉलर्स) इतकी भरभरुन कमाई केली आहे.

३. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मार्क वाहृबर्ग असून त्याची कमाई आहे जवळपास ४३३ कोटी रुपये (५८ दशलक्ष डॉलर्स).

४. अभिनेता-दिग्दर्शक बेन एफ्लेक चौथ्या क्रमांवर आहे. त्याने जवळपास ४११ कोटी रुपये (५५ दशलक्ष डॉलर्स) कमावले आहेत.

५. पाचव्या क्रमांकावर आहे विन डिझेल. या पठ्ठ्यानं जवळपास ४०३ कोटी रुपये (५४ दशलक्ष डॉलर्स) इतकी कमाई केली आहे.

६. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमारची कमाई जवळपास ३६२ कोटी रुपये (४८.५ दशलक्ष डॉलर्स) इतकी असून या यादीत त्यानं सहावा क्रमांक पटकावला आहे.

७. मॅनुअल मिरांडानं जवळपास ३४० कोटी रुपये (४५.५ दशलक्ष डॉलर्सची) कमाई करत सातवं स्थान पटकावलं आहे.

८. विल स्मिथनं जवळपास ३३२ कोटी रुपये (४४.५ दशलक्ष डॉलर्सची) कमाई केली आहे.

९. एडम सँडलर वर्षभरात जवळपास ३०६ कोटी रुपये (४१ दशलक्ष डॉलर्सची) कमाई करत नवव्या क्रमांकावर आहे.

१०. प्रेक्षकांचा लाडका जॅकी चॅन या यादीत शेवटच्या, म्हणजे दहाव्या क्रमांकावर असून त्यानं जवळपास २९९ कोटी रुपये (४० दशलक्ष डॉलर्सची) कमाई केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here