सातारा : पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर शनिवारी आटके टप्पा येथे स्विफ्ट कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पोतले (ता. कराड) येथील तरुण उद्योजक ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद चंद्रकांत पाटील (वय ३२, रा. पोतले ) असं ठार झालेल्या तरुण उद्योजकाचे नाव आहे. तर जखमीचे नाव समजू शकलेलं नाही. पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावरून सायंकाळी पाचच्या सुमारास शरद पाटील हे कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाली.

Aaditya Thackeray : राजीनामा देतो फक्त एक काम करा, आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवारांचं आव्हान स्वीकारत चॅलेंज
या अपघातात शरद पाटील यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.

दरम्यान, पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर पाचवड फाटा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक नाल्यात जाऊन अपघात झाला होता. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या एका घटनेमध्ये चार वाहने एकमेकांवर आढळल्याने वाहनांचे नुकसान झाले. ही घटनाही पाचवड फाटा येथेच घडली. दोन वाहन चालकांमध्ये झालेल्या वादावादीमुळे हा अपघात झाल्याचे समजते.

MI vs SRH: मुबंई इंडियन्सच्या समोर Do Or Die परिस्थिती; अशी आहेत प्ले-ऑफमध्ये जाण्याची समीकरणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here