एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात पोहोचले आहेत. त्यांची नियुक्ती क्राईम ब्रांचमध्ये करण्यात आली आहे. नायक यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली.
मुंबई: एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांना नवी पोस्टिंग मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत त्यांना तैनात करण्यात आलं आहे. नायक यांनी गुन्हे शाखेत पदभार स्वीकारला आहे. नायक यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दया नायक यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट नऊमध्ये पदभार स्वीकारला. दया नायक यांच्यासोबत पाच अन्य अधिकाऱ्यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये त्यांना पोस्टिंग दिली गेली आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत नवी पोस्टिंग मिळाल्याची माहिती दया नायक यांनी ट्विटरवरुन दिली. तुम्हा सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेन आणि माझ्या पूर्ण क्षमतेनं मुंबईची सेवा करेन, असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हृदयद्रावक! निकालाच्या दोन दिवस आधी सारंगचा मृत्यू; दहावीचा टॉपर ६ जणांना जीवदान देऊन गेला २८ मार्चला महाराष्ट्र एटीएसमधून दया नायक यांची मुंबई पोलिसात बदली झाली. मात्र त्यानंतर दोन महिने त्यांना पोस्टिंग मिळाली नव्हती. २८ मार्चपासूनच ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. दया नायक जवळपास तीन वर्षे एटीएसमध्ये कार्यरत होते. तब्बल दोन दशकांनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत रुजू झाले आहेत. १९९९ ते २००३ या कालावधीत नायक अंधेरी सीआययूमध्ये तैनात होते. त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत होती. त्यानंतर त्यांना कांदिवली पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली.
महत्वाचे लेख
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.