म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : पर्यावरणाला अनुकूल असलेल्या इलेक्ट्रिक बसगाड्या आता लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातही धावणार आहेत. अशा १३७ इलेक्ट्रिक बसगाड्या पहिल्या टप्प्यात दाखल होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे.प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी असा प्रवास करता यावा, यासाठी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसगाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या १३७ इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी रत्नागिरीसाठी ३७, दापोलीसाठी ३६, चिपळूणसाठी ३४ आणि खेडसाठी ३० गाड्या असतील. दरम्यान, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाने रत्नागिरी एसटी विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे. या विभागात तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार रु. उत्पन्न मिळाल्याची माहिती विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांत ४६ लाख ३६ हजार ९३ महिला प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे.

एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप
ऐन सुट्टीत प्रवाशांचे हाल

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण आदी आगारांमधून एसटी बस वेळेत सुटत नसल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. एसटी बस जिल्ह्यातील अनेक आगारांमधून वेळेत सुटत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अनेकदा एसटी बसगाड्या, चालक, वाहक उपलब्ध नसणे असे प्रकार घडत आहेत. त्यातच मे महिना असल्याने सुट्टीच्या हंगामात जिल्ह्यातील सर्वच एसटी बस स्थानकात मोठी गर्दी होत आहे.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here