चैन्नई- प्रसिद्ध गायक यांना झाली होती. यानंतर त्यांना एमजीएम इस्पितळात हलवण्यात आलं होतं. पण आता अचानक त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं आहे. इस्पितळाच्या प्रशासनाच्या मते, बालसुब्रमण्यम यांच्या प्रकृतीकडे तज्ज्ञ लोकांची टीम लक्ष ठेवून आहेत.

एसपी बालसुब्रमण्यम यांच्यात करोनाची हलकी लक्षणं दिसून आली होती. यानंतर त्यांची करोना चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेट होण्यास सांगितले होते. मात्र कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वतःला इस्पितळात भरती करण्याचा निर्णय घेतला. इस्पितळातून त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता.

या व्हिडिओत त्यांनी सांगितलं की, ‘दोन- तीन दिवसांपासून माझ्या छातीत दुखत होतं आणि थोडा खोकलाही होता. पण एक गायक म्हणून ही आमच्यासाठी सामान्य गोष्ट असते. मला नंतर तापही आला. इस्पितळात जाऊन तपासणी करून घेण्याचा मी निर्णय घेतला. तेव्हा मला करोनाची लागण झाल्याचं कळलं.’

करोनावर तयार केलं होतं गाणं

आता इस्पितळातच्या प्रशासनाकडून अधिकृत स्टेटमेन्ट जारी करण्यात आलं आहे. यात बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली असून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. सध्या प्रत्येकजण ते या आजारातून लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. प्रत्येकालाच त्यांना पुन्हा गाताना पाहायचं आहे. या दरम्यान एसपी बालसुब्रमण्यम यांनी करोना व्हायरसवर एक गाणंही तयार केलं होतं. त्यांनी आपल्या गाण्यातून जनजागृती अभियान चालवलं होतं. त्यांचं हे गाणं प्रेक्षकांनाही आवडलं होतं. आता ते स्वतः या व्हायरसशी लढा देत आहेत.

काल एसपी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती होती स्थिर

दरम्यान, काल इस्पितळाकडून सादर केल्या गेलेल्या स्टेटमेन्टमध्ये त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ऑक्सिजनची पातळीही सुधारली आहे असं लिहिण्यात आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here