सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र, या दोन हजाराच्या नोटा आता चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. यामुळे दोन हजाराच्या गुलाबी रंगाच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये एक कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय टीव्हीवर येत जाहीर केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. ५०० रुपयांची आणि दोन हजार रुपयांची नवी नोट बाजारमध्ये आणत असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती.दोन हजाराची नोट बाजारामध्ये उपलब्ध झाल्यानंतर त्यासंर्भातील काही अफवांमुळं चर्चेचा विषय ठरली होती. दोन हजाराची नोट उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांनी या नोटा बाजारामध्ये कमी प्रमाणामध्ये दिसू लागल्या. सर्वसामान्यांचे व्यवहार बँकांचे व्यवहार तसेच एटीएम मधून या नोटा कमी प्रमाणात बघायला मिळत होत्या. अशातच आता रिझर्व बँकेने दोन हजाराची नोट ३० सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितलं आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिक बँकांमध्ये तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगेत उभे असल्याचे बघायला मिळालं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बँकांमध्ये नागरिकांनी नोटा बदलून घेतल्या. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये एक कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतल्याची माहिती बँकांच्या वतीने देण्यात आली आहे. त्यासोबतच शहरातील ४० पेट्रोल पंपाच्या व्यवहारामध्ये सात ते आठ लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती पेट्रोल पंप संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, आरबीआयनं दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र आवश्यक नसून त्यासोबत कसलाही अर्ज भरण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा काही ठिकाणी स्वीकारण्यास नकार देखील दिला जात असल्याचं चित्र आहे.