पुणे : देशात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे (IPL) चं फिव्हर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये आता आयपीएल अखेरच्या टप्प्यात आल्याने क्रिकेट प्रेमींची धाकधूक वाढू लागली आहे. मात्र, या बरोबर सट्टा लावण्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे. पुण्यातल्या धनश्री सिग्नेचर सोसायटी, साईबाबा नगर, कोंढवा इथं एका फ्लॅटमध्ये क्रिकेटबेटिंग करणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.याप्रकरणी वसीम हनीफ शेख रा . कोंढवा, इक्रमा मकसुद मुल्ला रा . घोरपडी पेठ, मुसाबित मेहमुद बाशाइब रा सोमवार पेठ अशी या आरोपींची नावं आहेत. खंडणी विरोधी पथकाने या आरोपीना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, आयपीएलचा सट्टा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार, प्रत्येक गाण्यावर…; माजी पोलीस अधिकाऱ्याची मोठी मागणी तपासाच्या अनुषंगाने खंडणी विरोधीपथकाच्या पोलिसांनी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ३ जण कोंढवा इथे एका फ्लॅटवर क्रिकेट बेटिंग करत आहेत. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत फ्लॅटवर छापा मारला. दरम्यान ५ मोबाईल फोन व १ लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये ३ आरोपींनाही अटक केली आहे. त्या तिघांवर कोंढवा पोलीस स्टेशन इथे कलम ४२०, ३४ जुगार प्रतिबांधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे तर पुढील कारवाई पोलीस करत असल्याची माहिती आहे.