‘राज्यातील आमचे तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही. जर एखादा आमदार इकडचा तिकडे झाला, तर तो पुन्हा निवडून येणार नाही,’ असा टोला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला. ‘केंद्रीय मंत्री यांना भाजपने राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना असे काहीतरी बोलावेच लागेल,’ असेही ते म्हणाले.
वाचा:
‘राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही,’ असा दावा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. तर, राज्यातील सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असे वक्तव्य नुकतेच मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. त्यावर मुश्रीफ यांना विचारले असता ते बोलत होते.
संसर्गाच्या अनुषंगाने आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली . या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार , डॉ. किरण लहामटे, संग्राम जगताप, बबनराव पाचपुते मोनिका राजळे , जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुश्रीफ बोलत होते.
वाचा:
‘ यांच्या बद्दल सुरू असलेल्या प्रकाराबाबत मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी हा विषय आजोबा आणि नातवातला आहे, असे सांगत अधिक बोलणे टाळले. यावेळी त्यांनी लॉकडाऊन बाबत भाष्य केले .आता करोनासोबत आपण जगले पाहिजे. त्यामुळे आता लॉकडाऊन करण्याची कोणतीही गरज नाही. तसेच आजच्या बैठकीत कोणत्याही लोकप्रतिनिधीने लॉकडाऊन बाबत मागणी केली नाही,’ असेही ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times