मुंबई : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र शेतीचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता कडक उन्हाच्या झळा नागरिक सहन करत आहेत. या सगळ्यात मात्र पुढचे ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणारे आहेत. कारण, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य त्या ठिकाणी साठवणूक करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
Weather News : राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, अतिवृष्टीमुळे ३५ घरं उद्ध्वस्त दरम्यान, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशा खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, अंदमान निकोबार बेटांवर आणि अंदमानच्या समुद्रात दाखल झाला. त्यामुळे यंदा वेळेतच पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे काल नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी झाल्यामुळे इथं ३५ हून अधिक संसार उध्वस्त झाले. नदी-नाल्यांना पूर आले तर अनेक झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.